Ad will apear here
Next
उद्योजिकांच्या ‘भरारी’ला पाळंदे कुरिअरचा हात; अल्प दरात सेवा पुरवणार


पुणे :
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन झाल्याने सर्वच प्रकारच्या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक लघुउद्योजक, छोट्या उद्योजिका यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी उद्योजिकांच्या ‘घे भरारी’ या संस्थेने पाळंदे कुरिअरच्या साथीने अल्प दरात ‘डिलिव्हरी’ची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाळंदे कुरिअरच्या मदतीने उद्योजिका पुन्हा एकदा ‘भरारी’ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. 

या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (२८ मे २०२०) पुण्यातील कर्वे रस्त्यावरील पाळंदे कुरिअरच्या कार्यालयात चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पाळंदे कुरिअरचे आशिष पाळंदे, ‘घे भरारी’चे राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-एदलाबादकर आदी उपस्थित होते.

नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, ‘महिला व लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी ‘घे भरारी’ या महोत्सवाचे आयोजन केले जाते. २०० ते ३०० उद्योजिका या प्रदर्शनात सहभागी होत असतात; मात्र यंदा करोनामुळे हे प्रदर्शन घेता आले नाही आहे. त्यामुळे या महिलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाळंदे कुरिअर यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. करोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशा वेळी या महिला छोट्या उद्योगांतून आपल्या घराला उभारू शकतात. मास्क, सॅनिटायझर, खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लाइफ इन्शुरन्स, होम ऑटोमेशन, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हँडमेड दागिन्यांपासून खेळणी आणि इतर घरगुती उत्पादनापर्यंत सगळे काही ऑनलाइन मागविता येणार आहे.’

धनंजय देशपांडे म्हणाले, ‘करोनामुळे सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे. अशा वेळी मराठी उद्योजक एकत्रितपणे हा चांगला उपक्रम राबवत आहेत. याचा अनेकांना फायदा होईल. अधिकाधिक उद्योजकांनी यात सहभागी होऊन ‘डिलिव्हरी’ची व्यवस्था पाळंदे कुरिअरवर सोपवावी व आपण आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगवर भर द्यावा, जेणेकरून व्यवसायवाढीसाठी त्याचा उपयोग होईल. यातून नोकरीच्याही अनेक संधी निर्माण होतील. त्याचाही लाभ मराठी तरुणांनी घ्यायला हवा.’

आशिष पाळंदे म्हणाले, ‘कुरिअर सेवा देण्याची आमची ५० वर्षांची परंपरा आहे. आता या करोनाच्या संकटातून पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी अनेक छोट्या उद्योजकांशी संलग्न होऊन त्यांना अल्प दरात कुरिअर सेवा पुरवण्याचा प्रयत्न आहे. पुण्यासह ग्रीन झोनमध्ये ६० रुपयांऐवजी ३५ रुपयांत ही कुरिअर सेवा उपलब्ध होणार आहे. पुढील प्रत्येक किलोसाठी १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.’ 

‘करोनाच्या पार्श्वभूमीवर कुरिअर सेवा देताना सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. 

या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजिकांनी पाळंदे कुरिअरच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZMOCM
Similar Posts
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
जेनेट, रामेश्वरी, अभिलाषा ठरल्या ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ पुणे : व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल (इटर्नल ब्युटी), पुण्याच्या रामेश्वरी वैशंपायन (मिसेस) आणि चाळीसगावच्या अभिलाषा जाधव (मिस) यांनी पटकावले, तर इटर्नल ब्युटी प्रकारात औरंगाबादच्या स्वाती चव्हाण,
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language